छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती (१४ मे) निमित्य हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे
छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासून डोंगरासारखी संकटे ज्यांच्या वाट्याला
आली, गैरसमजा मुळे म्हणा किंवा इतरांच्या कट-कारस्तानाने ज्यांना आपल्या
पित्याचा ही कधी कधी राग ओढवून घ्यावा लागला आणि तरी ही अवघ्या मुघलायीशी
एकट्याने युद्ध केले. लढता लढताच मरण स्वीकारले. स्वाभिमान आणि स्वत्वाचा
खूप मोठा वारसा संभाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे. आऊ जिजाऊच्या
पदराखाली वाढलेले शंभू बाळ, कवी मनाचे शंभू बाळ पुढे अवघ्या मराठी
साम्राज्याच्या रखवाली पायी सह्याद्री सारखे कणखर झाले आणि शेवटच्या
श्वासापर्यंत छाव्यासारखे लढले.
त्यांच्या जयंती निमित्य काही दुखडे आम्हाला मांडायचे आहे, संभाजी
महाराजांचा इतिहास आपण बराच चूक मांडला आता पुन्हा त्या सत्य इतिहासाची आपण
एकदा फेर मांडणी करायला हवी. इतिहास शिकणाऱ्या तरुणांनी हे शिवधनुष्य
उचलावे. आणि संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या नावाने जे जातीय
द्वेषाचे राजकारण होत आहे ते थांबवावे. महाराष्ट्र हा दलित, ब्राम्हण,
मराठा या सगळ्यांचा आहे. इथच्या संकृतीवर, इतिहासावर, महापुरुषांवर
प्रत्येकाचा हक्क आहे. पहिल्याने दुसऱ्याचा किंवा तिसर्याचा, दुसर्याने
पहिल्याचा किंवा तिसर्याचा किंवा तिसर्याने पहिल्याचा किंवा दुसऱ्याचा
द्वेष करू नये. आणि कुणीही कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी बाळगण्याचा
प्रयत्न किंवा अट्टाहास करू नये; जमले तर विविध क्षेत्रात काही
इतर-समाजबांधव मागे राहत असतील त्यांना हात द्यावा, जुन्या जाचक - रूढी आणि
परंपरा यांना फाटा फोडून भावूबंधकीचा महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने
महा-राष्ट्र पुन्हा उभा करायला सर्वानीच 'जमेल तेथे जमेल तसे' प्रयत्न
करायला हवेत.
वेब वर संभाजी महाराजांबद्दल बरेच काही उपद्रवी लेख आहेत त्यांचा नायनाट
करणे हा आपण एक उदेष्य ठेवू, जिथे कुठे असे काही सापडेल ते पब्लिक फोरम
मध्ये नकळवता जमेल त्या मार्गाने नाहीसे करण्याचा प्रयत्न करूयात, हाच
संकल्प आज सोडू.
सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87
No comments:
Post a Comment