प्रवीण गेडाम (IAS)...Dr.Pravin Gedam IAS
Dr.Pravin Gedam a GOOD ADMINSTRATOR
या मथळ्याखाली "इंडिअन एक्स्प्रेस" या वर्तमानपत्राने ७ न. संपूर्ण पानावरच हि बातमी छापली होती.जळगाव पोलिसांकडे महापालिका आयुक्तांनी नोंदविलेला संपूर्ण "प्राथमिक माहिती अहवाल" (FIR ) अगदी जसाच तसा छापला होता.
एकदम start to end ...
या घटनेनंतर हा अधिकारी एकदम प्रकाशझोतात आला.सर्व सामान्य नागरिकांसाठी तर एकदम हिरोच बनला.सगळे विध्यार्थायंचे आकर्षण हा अधिकारी बनला.
पुण्यातील युनिक अकेडमी मध्ये "प्रिन्स व मनोहर नावाचे विध्यार्थी शिकत होते..
प्रिन्स ला सर्व अश्या क्लास वन अधिकार्यंची बरीच माहिती असे..
तेव्हा अकेदामिच्या नोटीस बोर्ड वर हि बातमी लावली गेली होती..सर्व विध्यार्थी कुतुहुलाने वाचत होते..प्रिन्स ने वाचली तेव्हा त्याच्याही चेहऱ्यावर टिपण्यासारखे भाव आले..
त्यामुळे मनोहर ने विचारले. "का रे प्रिन्स ओळखतो का यांना ?"
त्याचे उत्तर "हो,खूप चांगले ओळखतो !"
तो काही वेळ थांबून गंभीरतेने म्हणाला ..."हि तर फक्त सुरुवात आहे !"
त्याच्या बोलण्याला एक आधार होता. या व्यक्तिमत्वाने दापोलीमध्ये कार्यरत असताना फळ उत्पादन योजनेचा शेतामध्ये फिरून घेतलेला आढावा,काम झालेले दिसले तरच मजुरी देऊ हि घेतलेली भूमिका,या बाबी त्याला माहित होत्या..
शिवाय संगमनेरला असताना एकदम डेशिंगपने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम..अवघ्या या दीड दिवसाच्या मोहीम मध्ये सर्व रस्ते पूर्ण मोकळे करण्यात आले..संगमनेरकर हि मोहीम कधीच विसरू शकणार नाही.
डॉ.प्रवीण गेडाम (जिल्हाधिकारी)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेडिकल सायन्स या वैकल्पिक विषयात ४१२ गुणाचे रेकोर्ड करून IAS झालेले व्यक्ती.सन २००२ ची हि घटना.आज ११ वर्षे उलटून गेली तरी हा रेकोर्ड कायम आहे..या एकाच विषयाने यांना थेट कलेक्टर केले.
हा विक्रम मेडिकल सायन्स या विषयाचा,पण हा विषय घेण्याची जबरदस्त हिमत मात्र या डॉक्टरची. हि हिमत करण्याच्या अगोदर मात्र अत्यंत लोकप्रिय असणारा इतिहास हा विषय घेऊन upsc दिली होती पण त्यात अपयश आले होते.
"दुसर्या प्रयत्नाच्या वेळी इतिहास का सोडला ?"
डॉ...."मला इतिहास हा विषय घायचा न्हवता.."
"मग घेतला कस काय ?"
डॉ...."सगळे घेतात म्हणून मी घेतला"
हा पहिला attempt दिल्य्वर इतिहास विषय घेऊन IAS होणे आपले काम नाही हि बाब लक्षत आली.
सगळे हातात घेतात म्हणून नव्हे तर आपल्याला जमेल ते विषय आपण दुसर्या attempt साठी घेऊ हा निर्धार केला व अमलात हि आणला..
विषय आवडणारा असेल आणि गुण देणारा नसेल किवा विषय गुण भरपूर देत नसेल पण अभ्यास करताना झोप येत नसेल तर काही उपयोग नाही,अस यांचे ठाम मत.
नागपूरच्या हडस हायस्कूलच्या एकदा वर्ग शिक्षकाने प्रत्येक विध्यार्थ्याला एक प्रश्न विचारला,,प्रश होता...
"मोठेपणी काय व्हायचे ?"
कोणाला डॉक्टर,कोणाला इंजिनिअर,कोणाला शिक्षक,कोणाला वकील तर कोणाला अगदी कंडक्टर होण्याची अपेक्षा असलेली उत्तर शिक्षकाला मिळाली..
फक्त एक उत्तर एकमेव होत..म्हणजे हे ..उत्तर एकाच मुलाने दिल म्हणून एकमेव...उत्तर होत...
"मला कलेक्टर व्हायचे आहे !"
शिक्षकांनी नाव विचारले,
"प्रवीण नीलकंठराव गेडाम" विध्यार्थी उत्तरला.
घडले मात्र उलटच..
डॉक्टर होण्याची इच्छा नसलेला हा विध्यार्थी बारावीला विज्ञान शाखेत उत्तम गुण आल्यामुळे MBBS कडे वळला.नागपूरच्या Govt . Medical College मधून १९९९ साली डॉक्टर होऊन बाहेर पडले..
डॉक्टर होण्याच्या या सहा वर्षाच्या प्रक्रियेत शालेय जीवनातील उत्तर मात्र विस्मृतीत गेल.पेशंट,एप्रन,स्थेस्कोप,इंजेक्शन,लस..इत्यादी शब्दांमध्ये यांच्या मधला कलेक्टर लोप पावला.
एका वेगळ्याच विश्वात हि स्वारी रममाण झाली.
पण या काळात एक घटना घडली..
मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवर एक उत्तर भारतीय विद्यार्थी UPSC चा अभ्यास करायचा.हा विद्यार्थी प्रवीणचा होस्टेल मित्र. UPSC ची मोठी-मोठी पुस्तके घेऊन यायचा.."UPSC बहुत हार्ड होता हे ! बहुत पाध्ना पडता हे !" असे म्हणत सोलिड भाव खायचा.
बर्याच जणांनी UPSC करण्याची आकांश यांना भेटण्यानंतर सोडून दिली..
बघू तरी किती अवघड आहे ते ? म्हणत प्रविन्रव मात्र कामाला लागले.
जे होईल ते होईल...माज करू..एकच झिन्न..आणि फ़ोर्म भरला.
टार्गेट UPSC ...
हि घटना या डोकात्र्मध्ये कलेक्टर होण्याची इच्छा पुनर्जीवित करण्यास कारणीभूत ठरली.पूर्वी नमूद केल्या प्रमाणे पूर्व परीक्षेसाठी मेडिकल सायन्स या विषय ठरला..हा विषय घेऊन..दुसरा विषय ठरला इतिहास..
मेडिकल सायन्स गेली ६ वर्षामध्ये पूर्ण झालेला होता. UPSC साठी दोन विषयाची तयारी करावी लागते यांना मात्र एकाच विषयाची तयारी करावी लागली...तो म्हणजे इतिहास.
सन २००० या वर्षी सहज परीक्षेला बसले..ते सुधा राजस्थानातील जयपूर या परीक्षा केंद्रावर...कारण यावेळी पदव्युतर प्रवेश परीक्षेसाठी अभ्यास सुरु होता. UPSC पूर्व परीक्षा देण्यासाठी जयपूरला निघाल्यवर बेगमध्ये UPSC ची नाही तर MS (मास्तर ऑफ सर्जरी) साठी लागणारी पुस्तके होती.
यथावकाश MS साठी ओर्थोपेदिक व पेडीयात्रिक या दोन्ही शाखांमध्ये नंबर लागला.मुंबईमधील जे.जे.हॉस्पिटलच्या ग्रांड मेडिकल कॉलेज ला अडमिशन मिळाले...शिवाय सहज UPSC ची पूर्व परीक्षा पास झाले.पूर्वपरीक्षा झाल्यवर यथावकाश येथेच मुख्य परीक्षाही दिली..ती सहजच !
सहजच दिलेल्या पहिल्या प्रयत्नाचा रिझल्ट हि सहज लागला तोही "नापास" म्हणूनच..!
"गांभीर्याने प्रयत्न केल्यास आपण नक्की कलेक्टर होऊ",हि बाब मात्र सहज प्रयत्नाने उमजली.दुसरा प्रयत्न गांभीर्याने घेण्याचे ठरवल्यावर पहिला निर्णय घेतला तो "इतिहास" या विषयाला सोड्चीती देण्याचा. इतिहासाची जागा प्राणीशास्त्र (zoology ) विषयाने घेतली आणि प्रनिशास्त्रानेच यांना कलेक्टर करण्यचा इतिहास घडविला.मेडिकल सायन्स चा अभ्यास पूर्ण झाला असल्याने सामन्य अध्ययन दोन्ही पेपरवर लक्ष केंद्रित झाले..परिणामी सामन्य अध्यनाच्या दोन पेपरमध्ये मिळून ३४४ गुण आले..
तसं पाहता हा एकदम निवांत माणूस.अभ्यासाची पद्दत हि एकदम निवांत. परीक्षेसाठी म्हणून कधी अभ्यास केला नाही.नेहमी कोणताही विषय समजून घेण्यावर जास्त भर दिला..परीक्षा व त्याचे निकाल याचे कधीच टेन्शन घेतले नाही...
MBBS ला असताना अभ्यासावर कमी आणि जिम मध्ये शरीर काम्व्ण्यावर जास्त भर होता...
UPSC चा अंतिम निकाल लागला त्या दिवशीसुधा हि स्वारी निवांत झोपली होती.
अमित तेलंग ( IFS ) या मित्राने यादी पहिली...प्रवीण गेडाम...रेंक ३१ वी..
अमितने लगेच प्रवीणला फोन लावला व रिझल्ट सांगितला..गाढ झोपेत असल्याने प्रविनराव...ह...ह....करत एकूण घेतले व फोन आपटून ठेऊन दिला..
दोन-तीन तासांनी डॉक्टर अंथरुणावरून उठून बसले..."IAS झाल्याचे काय झक्कास स्वप्न पडले !" म्हणून स्वताशीच हसायला लागले...
स्वप्नात अमितची आठवण झाली म्हणून चला,अमितला फोन तरी करू म्हणत नंबर डायल केला..
अमितकडून पुन्हा तीच बातमी- "IAS झाल्यची"
आता मात्र काय कराव हे सुचत नव्हते..हे वास्तव का स्वप्न हेही काळात नव्हते..कसबसे मावसभावाचे होस्टेल गाठलं.स्वताला सावरत दोघांनी इन्टरनेट केफे गाठले. रिझल्टची एक प्रिंट घेतली....
१ पासून ३० पर्यंतची सगळी नाव खोडली...परत उलट्या क्रमाने ५० पासून ३२ पर्यंतची नवे खोडली.
आता विश्वास बसला..
डॉ.प्रवीण गेडाम- IAS हे वास्तव होत.
यानंतर पहिला फोन केला आईला....
"आई....आई...आई....sssss.....मी IAS झालो !"
'होतील बहु, असतील बहु पण या सम हाच' असेच वर्णन मावळते जिल्हाधिकारी
डॉ.प्रवीण गेडाम यांच्याबाबत करावे लागेल.जळगाव व लातूरची जिल्हा परिषदेची
कारकिर्द गाजवून डॉ.गेडाम हे उस्मानाबादला तीन वर्षापुर्वी उस्मानाबादला
जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते.त्यावेळी लोकांनी मोठ्या अपेक्षा
व्यक्त केल्या होत्या आणि अपेक्षा पुर्ण करण्यात डॉ.गेडाम यशस्वी ठरले
आहेत.
डॉ.गेडाम यांनी सर्वप्रथम बेशिस्त बनलेल्या महसूल यंत्रणेला शिस्त
लावली.त्यानंतर त्यांनी गोरगरिबांच्या अन्नावर गदा आणणा-या स्वस्त धान्य
दुकानदारांविरूध्द मोहिम उघडली.बोगस शिधा पत्रिकेला आळा घातला.त्यामुळे
गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानात धान्य व रॉकेल मिळू लागले.त्यानंतर
त्यांनी दहावी, बारावी परिक्षेत चालणा-या कॉपीला आळा घालण्यासाठी कठोर
पाऊले उचलली.
सर्वात लक्षवेधी काम तुळजापूरच्या तुळजाभवानी
तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी केले.तुळजापूरला ३७० कोटी रूपयाचा तिर्थक्षेत्र
विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे
होते.रस्ते रूंद करणे, विविध इमारती बांधणे, भाविकांसाठी विविध योजना
राबविणे गरजेचे होते.डॉ.गेडाम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम
केले.त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिरात पुजा-यांची जी दादागिरी चालू होती,
तीही त्यांनी हाणून पाडली.मंदिरात चालणारा विविध भ्रष्टाचारालाही लगाम
घातला.तुळजाभवानी मंदिराची जमिन काही लोकांनी लाटली होती, तीही काढून
घेण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर अनेक पुढा-यांनी व शिक्षण सम्राटांनी
शासकीय जमिनींचा गैरवापर करून, भुखंडाचे श्रीखंड केले होते.त्यावरही
डॉ.गेडाम यांनी जाता - जाता हिवराची मेख मारली.त्यांच्या तीन वर्षाच्या
कारकिर्दीत सर्वसामान्य जनता अत्यंत खूष होती.असा जिल्हाधिकारी आम्ही
पाहिला नव्हता, अश्याच प्रतिक्रिया उमटत होत्या.त्यांच्या कारकिदीत जी
शासकीय नोकर भरती झाली, ती अत्यंत पारदर्शक होती.त्यांच्याकडे तक्रार घेवून
जाणारा व्यक्ती निश्चितच समाधानी होत होता.जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जो
आपला कामाचा ठसा उमटाविला आहे, तो यापुर्वी कोणीच उमटाविला
नाही.जिल्हाधिकारी पदाची किंमत ख-या अर्थाने जनतेला कळाली होती.त्यांच्या
मोहिमेमुळे भ्रष्ट पुढारी व कामचुकार कर्मचारी धास्तावले होते.
त्यांची
बदली करू नये, त्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक
सामाजिक संघटनांनी करूनही शासनाने त्यांची पुण्याला बदली केली.त्यांच्या
बदलीमुळे काही मुठभर पुढारी आनंदीत झाले असले तरी, बहुतांश जनता नाराज
आहे.जनतेत एक प्रकारची संतापाची लाट निर्माण झाली आहे.
असो, डॉ.गेडाम
यांनी उस्मानाबादला जे काम केले, ते जनता कधीच विसरू शकत नाही.जिल्ह्यातील
जनता हमेशा त्यांना मिस् करेल, यात शंका नाही.
*स्वत:च्या घरी टँकर न मागविणारा जिल्हाधिकारी...
उस्मानाबाद
शहर व जिल्ह्यात एप्रिल, मे मध्ये भीषण पाणीटंचाई होती.जिल्ह्यात अनेक
गावात टँकरने पाणी पुरवठा चालू होता. हे टँकर सुरू करण्याचे अधिकार
जिल्हाधिका-यांना आहेत.
उस्मानाबादेतही आठ दिवसांतून एकदा नळ पाणी
पुरवठा चालू आहे.त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.या
पाणी टंचाईची झळ दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनाही
बसली.त्यांच्या बंगल्यात कुपनलिका आहे, मात्र त्याचे पाणी कमी झाले
आहे.नळाला तर आठ दिवसांतून एकदा पाणी येते.त्यांच्या घरात पाणी टंचाई
आहे.मनात आणले असते तर ते दररोज टँकरने पाणी मागविले असते.मागील
जिल्हाधिकारी पाणी टँचाईच्या काळात टँकर मागवत असत.मात्र डॉ.गेडाम यांनी
कधीच टँकर न मागवता, आहे त्या पाण्याची बचत करून दिवस काढले.
ही काही
काल्पनिक गोष्ट नाही तर सत्यता आहे.डॉ.गेडाम यांच्या मातोश्री लक्ष्मीकमल
गेडाम या प्रसिध्द लेखिका व गीतकार आहेत.त्यांच्या निसर्ग हिंदोळा या
गीताच्या सीडीच्या वेळी त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तेव्हा ही
अनुभूती आली.
आई लक्ष्मीकमल यांना पाणी टंचाईबाबत विचारले असता, त्यांनी
याबाबत प्लीज पेपरात लिहू नका, असे आम्हाला बजावले होते.मात्र आम्हाला
राहवत नाही, म्हणून ही वस्तुस्थिती लिहित आहे.यावरून स्पष्ट होते की,
जिल्हाधिकारी डॉ.गेडाम किती आपल्या कामाशी प्रामाणिक होते.त्यांनी आपल्या
पदाचा कधीच गैरवापर केला नाही.असा जिल्हाधिकारी उस्मानाबादला लाभला, हे
उस्मानाबादकरांचे नशिबच समजावे लागेल.
* नव्या बंगल्याचे कामही थांबविले
उस्मानाबाच्या
जिल्हाधिका-यांचा संध्याचा बंगला खूप पुरातण आहे.त्यामुळे आहे त्या
बंगल्याजवळ नव्या बंगल्याचे काम गेल्या काही महिन्यापासून चालू आहे.मात्र
पाणी टंचाईमुळे या बंगल्याचे काम काही महिन्यापुर्वी थांबविण्यात आले आहे.
हा
या नव्या बंगल्यात पहिला प्रवेश डॉ.गेडाम यांचा होईल, असे वाटले
होते,मात्र याचा हव्यास डॉ.गेडाम यांना नव्हता.अन्यथा टँकरने पाणी आणून या
बंगल्याचे काम मागेच पुर्ण करता आले असते.
डॉ.गेडाम यांना उस्मानाबाद लाइव्हचा मानाचा मुजरा...
हेच फळ का ?
डॉ.प्रवीण
गेडाम यांनी उस्मानाबादला तीन वर्षे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत चांगले
काम केले.त्यांच्या कामावर उस्मानाबादची जनता अत्यंत खूष होती.मात्र
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.गेडाम यांना नाउमेद करण्याचे काम राज्य
सरकारने केले आहे.त्यांची भूजल सर्व्हेक्षण खात्याचे संचालक म्हणून
पुण्याला बदली करण्यात आली आहे.हे कार्यालय अत्यंत छोटे असून, काम करण्यास
कसलाच वाव नाही.उस्मानाबादला चांगले काम केलेले हेच फळ का, असा प्रश्न कधी-
कधी पडत आहे.त्यांची अन्यत्र जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असती तर,
त्यांनी आपली झलक आणखी दाखविली असती...मात्र राज्यकर्त्यांना ते नको
आहे....
taluka omerga dist osmanabad Cha aahe sirani khop Chang kaam kela.
ReplyDeleteGREAT
ReplyDeleteYou did a great job sir ✌️😊
ReplyDeleteyou did a great job sir
ReplyDeleteनमस्कार सर 🙏🙏
ReplyDeleteखुप छान.... साहेब.
ReplyDeleteVery Good
ReplyDeleteVery good 👍
ReplyDelete👍 डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी मेडिकल फिल् मधले असून सुद्धा आपल्या कामाची छाप खूप चांगल्या पद्धतीने पाडली कोणत्याही राजकीय दवाबाला बळी न पडता खंबीरपणे गोरगरीब सर्वसामान्यांची कामे खूप चांगल्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात केली
ReplyDeleteडॉ. गेडाम सरांसारखे सनदी अधिकाऱ्यांची फार गरज आहे.
ReplyDelete