पवार साहेब आणि खेळ "राजकीय+क्रिकेट"
असं म्हणतात की, फार फार पुर्वी जेव्हा भारतात महात्मा गांधींचा करिष्मा सुरु होता, म्हणजे नोटेवरील गांधींपेक्षा खरेखुरे गांधी जेव्हा लोकांना अधिक प्रिय होते तेव्हा त्यांना पत्र पाठवताना केवळ महात्मा गांधी एवढेच टाईप केले जायचे… ते जेथे असतील तेथे त्यांना ते पत्र पोहचेत केले जायचे… वर्ष उलटली…त्यानंतर महाराष्ट्रात काहीसं असचं एकायला मिळायचे…अगदी आजही शरद पवार कुठले म्हटले की, शाळेतला शेंबडा पोरही बारामती असं उत्तर देतो म्हणे… इतका शरद पवारांचा बारामतीशी जिव्हाळा..असं असतानाही शरद पवारांना आता मुंबईकर होण्याचं ठरवलंय… आणि तेही सक्रीय राजकारणात 46 वर्ष उलटल्यानंतर…म्हणजे शरद पवारांचा दक्षिण मंुबईत तसा मोठा बंगला आहे. पण कागदोपत्री आजही पवार बारामतीकरच होते. यापुढे शरद पवारांचा पत्ता असणार आहे..बंगलो नंबर 2, सिलव्हर ओक इस्टेट, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई -26…
आजवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला हा पत्ता सध्या यामुळेच चर्चेत आलाय. शरद पवारांनी तब्बल 46 वर्ष राजकारणात आपला ठसा उमठविल्यानंतर असं नेमकं काय घडलं की, पवारांना आपला पत्ता निवडणूक आयोगाकडे बदलावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवारांनी मतदार नोंदणी कार्यालयात फॉर्म नंबर 6 चा अर्ज दाखल केलाय. यानुसार आता बारामती मतदार केंद्रातील पवाराचं नाव वगळलं जाणार आणि मुंबईत ते दाखल करून घेणार.
राष्ट्रवादीला मुंबईत मिळणारं मत किमान एकनं तरी वाढवण्यासाठी पवारांनी हा निर्णय घेतल्याची टीका त्यांचे विरोधक करतायत. पण पवार कोणतीच गोष्ट कधी विनाकारण करत नाही.. क्रिकेटच्या मैदानावर पवारांना पुन्हा बॅटिंग करण्यासाठीच ही पत्ता बदलाची फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या घटनेनुसार केवळ मुंबईचाच रहिवासी हा कार्यकारी पदाची निवडणूक लढवू शकतो.
पवार हे बारामतीचे रहिवासी असल्यामुळे गेल्यावेळी पवारांना निवडणूक लढवता आली नव्हती. हा नियम म्हणे याआधीही अस्तित्वात होता आणि तो असतानाही पवार दहा वर्ष एमसीएचे अध्यक्ष होतेच. अचानक विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि मग पवार मुंबईकर नसल्याचा साक्षात्कार झाला गेला. आणि नोबॉलवर पवारांची विकेट काढली गेली. आता येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक होऊ घातलीय. आणि या निवडणुकीसाठीच पवारांनी आपला पत्ता बदलून घेतलाय असं म्हटलं जातंय.
शरद पवारांनी जाहीरपणे एमसीएच्या कार्यालयातचं महिनाभरापुर्वी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. पण आजवरचा इतिहास पाहता ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं करतात. त्यामुळे ते निवडणूक नाही लढवणार म्हटले म्हणजे हमखास लढवणार असा आपण अर्थ घ्यायचा. नुकताच नाही का महाराष्ट्रात दृष्काळ चालू असताना शाही पध्दतीनं लग्न करणार्या आपल्याच पक्षाच्या कॅबिनेट मिनिस्टर भास्कर जाधवयांच्यावर पवारांनी जाहीर टीका केली होती. अशा लोकांनी सार्वजनिक जीवन सोडून इतर पर्यायांचा विचार करावा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारलं होतं.
पण त्यानंतर चारच महिन्यांत.. त्याच जाधवांना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं.. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली… तेव्हा शरद पवार हे मराठी मातीतीतले कसलेले पैलवान आहेत, कधी कुणाला धोबीपछाड देतील हे सांगता येणार नाहीत. तुर्तास पवारांनी मुंबईकर होण्याचा निर्णय घेतलाय. एकप्रकारे हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या दिशेनं टाकलेले आणखिन एक पावूल आहे.
काही दिवसांनी शरद पवार साहेब हे निवडणूक लढवणार हे सांगत जरी नसले तरी नक्की आहे. तेव्हाचं पवारांची प्रतिक्रीयाही आताच सांगून टाकतो.."पवार त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतील, क्रिकेट कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मी नाही म्हणू शकलो नाही…"
पवारांच्या या प्रतिक्रीयेनंतर मीडियाची आणखिन एक कॅम्पेन सुरु होईल. पवारांनी वयाच्या 72 व्या वर्षी अध्यक्ष व्हावे का ? कारण काँग्रेसप्रणीत देशातील सरकार ज्यात शरद पवारही सामील आहे, ते जे क्रीडा बिल आणू पाहतायत त्यानुसार 70 वर्षावरील व्यक्ती कोणत्याही संघटनेचं पद भुषवू शकत नाही…
पण वयाच्या १४ व्या वर्षापासून ते आज २१ व्या वयापर्यंत गल्लीतील गटप्रमुख,वार्ड अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष,राष्ट्रीय अध्यक्ष पर्यंत मी हेच शिकलो कि, "राजकारणात कायदा,नियम हे पाळण्यासाठी नाही तर तोडण्यासाठीच असतात.."
No comments:
Post a Comment